शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जानेवारी 2020 (12:52 IST)

दीपिकाने शिवली रणवीरची पॅन्ट

बॉलिवूडमधली चर्चित आणि सर्वांची आवडती जोडी म्हणजे दीपिका-रणवीरची जोडी. दोघेही प्रसिद्ध असून त्यांची लव्ह केमिस्ट्री वेगळीच आहे. त्यातून ते जेव्हा एकमेकांचे किस्से रंगवून सांगतात तेव्हा चाहत्यांना ते ऐकायला मजा वाटतेच.
 
अलिकडेच दीपिकाने ‘द कपिल शर्मा’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने एक किस्सा सांगितले जेव्हा तिला रणवीरची पॅन्ट शिवायला लागली होती. ती म्हणाली की रणवीर माझ्यासोबत असल्यास मी कायम शिवणकामाचं सामानसोबत घेऊन फिरते.
 
तिने किस्सा शेअर करत म्हटलं की एकदा ते बार्सिलोना येथे एका म्युझिक फेस्टिव्हलमध्ये गेले असताना रणवीर खूप जोशमध्ये नाचत होता. त्याने लूज पॅन्ट घातलेली आहे याचा विसर पडला असावा त्याला आणि तेवढ्यात दीपिकाला काही तरी फाटल्याचा आवाज आला. तेव्हा रणवीरची पॅन्ट फाटली होती आणि अशा परिस्थितीत तिला भर कार्यक्रमात रणवीरची पॅन्ट शिवावी लागली होती. 
 
ती म्हणाली की आनंदाच्या भरात तो चित्रविचित्र डान्स स्टेपही करत होतो. आणि अशी परिस्थिती निर्माण होते. कार्यक्रमात तिने असे बरेच रंजक किस्से सांगितले. सध्या दीपिका आगामी ‘छपाक’ चित्रपटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 10  जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.