सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 जुलै 2019 (13:31 IST)

बॉलीवूडच्या या ख्यातनाम लोकांची जगभरातील सर्वाधिक झाली प्रशंसा, बच्चन परिवारातील दोन सदस्य देखील सामील

जगभरात सर्वात जास्त प्रशंसा मिळवणार्‍यांची एक यादी प्रसिद्ध करणारी संस्था YouGov ने या वर्षाच्या सर्वात प्रशंसीत व्यक्तींची यादी तयार केली आहे. या यादीत देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदीसमेत बॉलीवूडचे बरेच अभिनेते आणि नायिकांनी जागा बनवली आहे. या लिस्टमध्ये महानायक अमिताभ बच्चनसमेत शाहरुख खान आणि सलमान खानचे नाव सामील आहे.   
इंटरनेट आणि डाटा मार्केटिंग फर्म YouGov ने ही यादी ऑनलाईन वोटिंगच्या आधारे प्रसिद्ध केली आहे. बॉलीवूडचे पुरुष कलाकारांच्या यादीत सर्वात टॉपवर अमिताभ बच्चन यांचे नाव आहे. YouGov ने आपल्या या लिस्टमध्ये त्यांना 12वा स्थान दिला आहे. जेव्हाकी किंग खान अर्थात शाहरुख खान या यादीत 16व्या जागेवर आहे.  
शाहरुख आणि अमिताभ बच्चन नंतर सलमान खान देखील या लिस्टमध्ये आपली जागा बनवण्यात यशस्वी झाला आहे. तो YouGov च्या यादीत 18व्या जागेवर आहे. तसेच YouGov ची 20 सर्वात जास्त प्रशंसा मिळवणार्‍या नायिकांबद्दल बोलायचे झाले तर या लिस्टमध्ये बच्चन परिवाराची सून ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रासमेत दीपिका पादुकोण आणि सुष्मिता सेनचे नाव सामील आहे.   
महिलांच्या यादीत दीपिका पादुकोण 13व्या जागेवर असून ती बॉलीवूड नायिकांमध्ये सर्वात टॉपवर आहे. दीपिका नंतर नेहमी चर्चेत राहणारी प्रियंका चोप्राचे नाव येत. तिने  YouGovच्या यादीत 14व्या स्थान मिळवला आहे. ऐश्वर्या राय बच्चन 16व्या आणि सुष्मिता सेन 17व्या जागेवर आहे.  
या दरम्यान सुष्मिता सेनने चाहत्यांद्वारे मिळालेल्या प्रेमाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमाने त्यांना धन्यवाद म्हटले आहे. तिने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर YouGov ची संपूर्ण लिस्ट प्रसिद्ध करत चाहत्यांना धन्यवाद दिला आहे. तिचे चाहते देखील कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहे.