गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अमिताभ- जया यांचा फोटो व्हायरल, नेहमी रागात का दिसते सुपरस्टारची बायको?

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात आणि अलीकडे अमिताभ आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत जया बच्चन आणि अमिताभ सोबत दिसत आहे. यात जया यांनी अमिताभ यांच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असून त्यांचा हात धरलेला आहे.
 
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा व्हायरल फोटो त्यांनी पोस्ट किंवा शेअर केलेला नाही. पण या फोटोमुळे जया बच्चन यांना ट्रोल केले जात आहे. यूजर्स अनेक प्रकाराचे कमेंट्स करत आहे. खरं तर जया बच्चन यांना फोटो काढवण्यात जरासी रस नाही असे सर्वांना माहीतच आहे. अनेकदा मीडियावर जया बच्चन भडकली असून चर्चेत राहून चुकली आहे.
 
तसेच या फोटोवर देखील यूजर्स गप्प तरी कसे बसणार. एकाने कमेंट करत लिहिले की अखेर त्या फोटो काढवण्यासाठी तयार झाल्या. दुसर्‍याने लिहिले या महिलेला फार गर्व आहे. तर कोणी लिहिले की अखेर त्यांना आपल्या सुपरस्टार नवर्‍यासाठी वेळ तर मिळाला. अर्थात सर्व अमिताभ यांचे चाहते होते परंतू जया बच्चन आपल्या स्वभावामुळे ट्रोल होताना दिसत आहे.
 
एका यूजरने तर हे देखील लिहून दिले की या तर नेहमी रागातच असतात. यांना तर सिनेमात देखील राग येतो. या कधी हसता तरी का? तर कोणीही लिहिले फोटो काढणार्‍या परवानगी मिळाली तर कशी. एकाने तर एवढे देखील लिहून दिले की अमिताभ आपल्यासोबत राहतात म्हणून त्यांना अवॉर्ड दिलं पाहिजे.
 
एकूण काय तर जया बच्चन मीडिया फ्रेंडली नसल्यामुळे ट्रोल झाल्या आणि सिनेमाबद्दल सांगायचं तर सध्या त्या इंड्रस्टीत सक्रिय नाही पण होय मागील दिवसात निवडणुका दरम्यान त्यांना सपासाठी प्रचार करताना बघितले गेले होते. जया बच्चन समाजवादी पक्षाची राज्यसभा खासदार आहे. तसेच अमिताभ राजकारणापासून लांब इंड्रस्टीत व्यस्त आहे. त्याच्याकडे अनेक मोठ्या चित्रपटांचे ऑफर आहे.
 
या पूर्वी जया बच्चन कधी ऐश्वर्या तर कधी आराध्या तर कधी अभिषेकची बाजू घेत मीडियाशी भिडलेली आहे.