मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जानेवारी 2020 (12:28 IST)

#MeToo मोहिमेविषयी सनी लिओनीचे मत ऐकून व्हाल हैराण

बॉलिवूड कलाकार आणि सर्वांची आवडती अभिनेत्री सनी लिओनीने अलिकडेच एका कार्यक्रमात #MeToo मोहिमेविषयी आपलं मत व्यक्त केलं. 
 
तिचं मत लक्ष वेधणारं होतं. तिनं म्हटलं की #MeToo मोहिमेमुळे लोकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. या मोहिमेमुळे महिला सशक्तीकरण झालं आहे. 
 
ती म्हणाली की मी आभासी जगात वावरते. मी कोणत्याही कार्यालयात काम करत नसल्यामुळे मी वास्तविक जगात जगत नाही. परंतु सनीला असं कायम वाटतं की कार्यालयात जर महिलांवर किंवा पुरुषांवर कोणत्याही प्रकारचे अन्याय किंवा शोषण होत असेल तर त्यांनी याविषयी आवाज उठवला पाहिजे. तसेच केवळ महिलांचेच नाही तर पुरुषांचंदेखील शोषण होतं.
 
कामाच्या ठिकाणी होत असलेला अन्याय, अत्याचाराविरुद्ध न घाबरता आवाज उठवला पाहिजे. ही आवाज वाढेल तेव्हाच जनजागृती वाढेल. बोल्ड सनीचं मत ऐकून सर्व हैराण होते.