रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘मॅलेफिसेंट’ च्या सीक्वला ऐश्वर्याचा आवाज

वॉल्ट डिझ्नी यांची निर्मिती असलेला लोकप्रिय ‘मॅलेफिसेंट’  या चित्रपटाचं सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मॅलेफिसेंट: मिस्ट्रेस ऑफ इविल’ हा चित्रपट हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन चित्रपटातील मॅलेफिसेंट या मुख्य भूमिकेला तिचा आवाज देणार आहे. हिंदीमध्ये ऐश्वर्याचा आवाज डब करण्यात आला आहे. या चित्रपटामध्येही एंजेलिना जोलीच मॅलेफिसेंटची भूमिका आहे.
 
या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये मॅलेफिसेंटसाठी ऐश्वर्याचा आवाज योग्य असल्याचं मानण्यात येत आहे. त्यामुळे डबिंगसाठी ऐश्वर्याची निवड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा  एक डार्क फॅन्टसी चित्रपट असून यात एक परिकथा दाखविण्यात आली आहे.