सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: कॅलिफोर्निया , मंगळवार, 30 जुलै 2019 (10:40 IST)

मिनी माऊसचा “आवाज’ देणार्‍या रसी टेलर यांचे निधन

“मिनी माऊस’ या जगप्रसिद्ध कार्टून पात्राला तब्बल तीन दशकांहून अधिक काळ आपला आवाज देणाऱ्या ज्येष्ठ कलाकार रसी टेलर यांचे निधन झाले. रसी टेलर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये अखेरचा श्वास घेतला.

वॉल्ट डिस्नी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर यांनी टेलर यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना श्रद्धांजली अर्पण केली. “मिकी माऊस’ या प्रसिद्ध पात्राला आवाज देणारे कलाकार वेन ऑलवाइन यांच्या रसी या पत्नी होत. रसी यांचा जन्म मॅसॅच्युसेट्‌समध्ये 4 मे 1944 रोजी झाला होता. 1986 मध्ये “मिनी माऊस’ या कार्टून पात्राला आवाज देण्यासाठी त्यांची शेकडो उमेदवारांमधून निवड झाली होती.