मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

या महिलेला ऐकू येत नाही पुरुषांचा आवाज

आपण वेगवेगळे प्रकाराचे लोकं बघितले असतील ज्यांना आरोग्याबद्दल विचित्र विचित्र तक्रारी असतात. कोणाला कमी ऐकू येतं तर कोणी वास घेण्याची शक्ती गमावलेली असते. परंतू आपण अशा महिलेबद्दल जाणून हैराण व्हाल जिला पुरुषांचा आवाज ऐकू येत नाही.  
 
या संबंधित माहिती हैराण करणारी आहे. चीन रहिवासी ही महिला एका विचित्र आजाराला सामोरा जात आहे, ज्यात तिला महिलांचा आवाज ऐकू येत नव्हता परंतू आता एक नवीन रिर्पोटप्रमाणे झोप घेत असलेल्या एक महिलेच्या कानात असे काही झाले ज्यामुळे तिला पुरुषांचा आवाज ऐकू येणे बंद झाले.
 
महिलेने सांगितले की तिला झोपताना रात्री कानात काही घंटी वाजल्यासारखे जाणवले आणि नंतर उलट्या होऊ लागल्या. यानंतर तिला हियरिंग लॉसचा त्रास जाणवला. डॉक्टरप्रमाणे तिला लो- फ्रीक्वेंसीचा आवाज ऐकू येत नाही.
 
डॉक्टरांप्रमाणे हा अंशतः बहिरेपणा आहे. पुरुषांचा आवाज लो-फ्रीक्वेंसीचा असल्याने या महिलेला पुरुषांचा आवाज ऐकू येत नाही. ती केवळ महिलांचा आवाज ऐकण्यातच सक्षम आहे.