सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली नवरी

ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून गेली. मध्य प्रदेशातील सिरोंजच्या टोरी बागरोदमधील ही घटना समोर आली आहे ज्यामुळे सर्व हैराण झाले आहेत. 
 
21 वर्षीय तरुणीचे लग्न गंजबासौदा जवळीक आसट गाव रहिवासी एका तरुणासोबत झालं होतं. या लग्नात टोरी बागरोद येथील मंदिरात पुरोहित विनोद शर्मा यांनी लग्नाच्या सर्व क्रिया संपन्न करवल्या होत्या.
 
लग्नानंतर नवरीमुलगी आपल्या सासरी निघून गेली आणि तीन दिवस तेथे राहून पुन्हा माहेरी आली. 23 मे रोजी तरुणीचे कुटुंबातील सदस्य गावाच्या एका लग्न समारंभात सामील होण्यासाठी गेले असताना ती गुरुजी विनोदसह घरातून पळून गेली.
 
पोलिसांप्रमाणे, नवविवाहित तरुणी सासरहून मिळालेले दीड लाख रुपयांचे दागिने आणि 30 हजार रुपये कॅश आपल्यासोबत घेऊन गेली. नातेवाइकांच्या फिर्यादीवर पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
माहितीप्रमाणे तरुणी ज्या गुरुजीसोबत पळाली तो विवाहित असून तीन मुलांचा बाप आहे. दोघांचे पूर्वीपासून प्रेम प्रसंग असल्याची सांगण्यात येत आहे.