SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, पेट्रोल पंप बंद  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. भोपाळ, इंदूरसह अनेक जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये सुट्टी घोषित करण्यात आली. सावधगिरी म्हणून ग्वाल्हेर, भिंड, सीधी, सिंगरौली सह अनेक जिल्ह्यात कलेक्टरने शाळा आणि कॉलेजमध्ये सुट्टीची घोषणा केली आहे.
				  													
						
																							
									  
	 
	बंदमुळे पूर्ण राज्यात हायअलर्ट आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू आहे. पोलिस मुख्यालयाने एसपी अधिकार्यांना सतर्क राहण्याचे निदेँश दिले आहेत आणि सर्व जिल्ह्यांना अतिरिक्त फोर्स प्रदान करण्यात आले आहे. राज्यात एसएफच्या 34 कंपनी आणि 6000 नवआरक्षकांना तैनात केले गेले आहे. पूर्ण प्रदेशात स्थानिक स्तरावर पेट्रोलिंग केली जात आहे. पोलिसांची सोशल मीडियावर ही नजर आहे.
				  				  
	 
	पोलिस मुख्यालयाने आधीपासूनच भडकवणारे मेसेज पाठवणार्यांवर सक्त कारवाईचे निर्देश जारी केले आहे. एससी-एसटी ऍक्टमध्ये संशोधन विरुद्ध सुमारे 45 संघटनांनी गुरुवारी भारत बंदची घोषणा केली आहे. एप्रिलमध्ये दलित भारत बंद दरम्यान झालेल्या झडपांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. या जिल्ह्यांमध्ये विशेष सतर्कतेसाठी निर्देश देण्यात आले आहे.