1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 5 सप्टेंबर 2018 (16:43 IST)

केजरीवाल सर्वोत्तम, सर्व्हेत दिसून आले

Arvind kejariwal
अरविंद केजरीवाल हे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असल्याचं एका सर्व्हे करणाऱ्या कंपनीने म्हटलं आहे. I-PAC नावाच्या राजकीय सल्ले देणाऱ्या एका कंपनीने हा सर्व्हे केला आहे. पहिल्या टॉप तीन मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही. केजरीवाल यांच्यानंतर सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांचा नंबर आहे तर तिसरा नंबर ओडिशाच्या नवीन पटनायक यांचा आहे.
 
राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये  भाजपचे मुख्यमंत्री आहेत. तिथे निवडणुका होणार असून या तीन राज्यातील एकाही मुख्यमंत्र्याला या यादीत स्थान न मिळणं ही भाजपसाठी चिंतेची बाब असल्याचं मानलं जात आहे.
 
हा सर्व्हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला होता. ज्यात ८ वर्षांवरील नागरिकांनी सहभाग घेतला होता असं या कंपनीचं म्हणणं आहे. देशभरातील जवळपास ७५३६ महाविद्यालये  या सर्वेक्षणात सहभागी झाली होती असं आयपॅकचं म्हणणं आहे.