सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 सप्टेंबर 2018 (09:14 IST)

तुम्ही केलेले वक्तव्य अत्यंत लच्छनास्पद, राम कदमला आवाहन

बेताल आणि निर्लज्ज वक्तव्य करत भाजपा आमदार राम कदम टीकेचे धनी तर झालेच आहेत त्यातही भाजपची प्रतिमा महिला वर्गात वाईट झाली आहे. मुलगी उचलून आणतो अश्या आशयाचे वक्तव्य केल्याने कदम आणि भाजपला जोरदार टीका होते. त्यात आता एका मुलीने कदमला दमच भरला आहे. मला हात तर लाव मग तुला दाखवते असे आवाहन दिले आहे. हा व्हिडियो आहे मीनाक्षी पाटील यांचा, त्या म्हणतात --
 
राम कदम मी तुम्हाला चॅलेन्ज करतेय, मला तुम्ही मुंबईत बोलवा किंवा मी मुंबईमध्ये येते, मला तुम्ही फक्त एक बोट लावून दाखवा, बाकी पुढंच उचलून न्यायची गोष्ट मी नंतर बघते.तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे, ते अत्यंत लांच्छनास्पद आहे, शिवाय आपण महाराष्ट्रात राहतो. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, इथं स्त्रीला देव्हाऱ्यातली देवी समजतात. त्यामुळे तुमच्या असल्या घाणेरड्या वक्तव्यांची महाराष्ट्रात येथे जागा नाहीय. तुम्ही ज्या काही प्रकरणावर बोलला आहात ना, मला त्याची शहानिशा करायची आहे. भेटूयात आपण आमने सामने, तुमच्या फोनची मी नक्कीच वाट बघेन, आजपर्यंत तुम्हाला मी खूप कॉल केले होते. याच्या आधीपण तुमच्या काही वक्तव्यांवर कॉल केले होते. आताही मी तुम्हाला कॉल केले होते, पण तुमच्याकडून अन्सर नाहीय. आता प्रतिक्षा मला तुमच्या कॉलची आहे सर, नक्की कॉल करा मला, तुम्ही नक्की कॉल कराल ही अपेक्षा.