1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 सप्टेंबर 2018 (16:40 IST)

भररस्त्यात दहीहंडी, संतोष जुवेकरवर गुन्हा दाखल

dahi handi
पुण्यातील सहकार नगरातील अरण्येश्वर चौकात या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अभिनेता संतोष जुवेकर प्रमुख पाहुणा म्हणून आला होता. पंचवीस बाय वीस लांब रस्त्यात ही दहीहंडी उभारण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण रस्ता अडवला गेला. परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. या शिवाय दहीहंडीवेळी प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजात डॉल्बी लावण्यात आला होता. त्यामुळे ध्वनीप्रदूषण झालं होतं. त्यामुळे सहकार नगर पोलिसांनी संतोष जुवेकरसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.