बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 मे 2019 (11:34 IST)

गोरक्षेच्या नावाखाली तीन लोकांसोबत मारहाण, ओवेसी म्हणाले- नवीन भारतात आपले स्वागत आहे

लोकसभा निवडणूक निकाल लागून अजून एक दिवस झाला आणि गो संरक्षणाच्या नावाखाली होणार्‍या गुंडगिरीचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील सिवनी येथील आहे. येथे काही लोकांनी गोमांस घेऊन जात असल्याची सूचना मिळाल्यावर तीन लोकांसोबत मारहाण केली. एवढेच नव्हे तर पीडित लोकांकडून जय श्रीराम असे नारे लावण्यासाठी दबाव देखील टाकला.
 
हा व्हिडिओ तीन दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे. उपद्रव करणारे लोक राम सेनेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. राम सेनेच्या लोकांना ऑटोमध्ये दोन तरुण आणि एक महिला गोमांस घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती.
 
सेनेचे लोकं घटनास्थळी पोहचले आणि काठ्याने पीडितांना मारणे सुरू केले. तरुणांसोबत क्रूरपणाच्या मर्यादा ओलांडल्या गेला. तसेच महिलेलादेखील सोडले नाही. या घटनेवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमिनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांचे म्हणणे आहे की हे धर्मनिरपेक्षतेचे मुखवटा आहे.
 
मुस्लिम लोकांवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याने ट्विट करत म्हटले की, 'मोदींच्या मतदाता द्वारे निर्मित देखरेख समितीचे सदस्य मुसलमानांबरोबर या प्रकारे व्यवहार करतात. नवीन भारतात आपले स्वागत आहे जे समावेशी आहे आणि जसे की पीएमओचे म्हणणे आहे धर्मनिरपेक्षते मुखवटा.'