संबंधित माहिती
- TikTok वर व्हायरल होण्यासाठी ट्रेनिंग, एका महिन्याची फी जाणून घ्या
- बिग बी अमिताभ बच्चन तब्बल 25 वर्षांनी मराठी सिनेमात झळकणार!
- स्वरा भास्करसोबत सेल्फीचा बहाणा करून बोलला- येणार तर मोदीच
- सोशल मीडिया फॉलोअर्स: पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प मागे सोडलं, राहुल गांधीपेक्षा 100 पट पुढे
- गायक विशाल ददलानीला २० लाखांचा दंड
सोशल मिडीयावर बच्चन यांच्या ट्विटची चर्चा
‘किंमत दोघांनाही चुकवावी लागते, बोलणाऱ्यांना आणि शांत बसणाऱ्यांनाही.. सोशल मीडिया की पहचानी है जानी मानी कहानी है..’ असे बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विट केल आहे. आता त्यांच्या या ट्विटची चर्चा होत असून हे ट्विट नक्की कोणत्या संदर्भात केलंय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
आताच्या ताज्या ट्विटमध्येही त्यांनी काव्यात्मक पद्धतीने लिहिलंय. अनेक चाहत्यांनी त्याबद्दल त्यांचं कौतुक केले आहे, मात्र काही चाहते त्यांना प्रतिक्रिया देऊन विचारत आहेत की हे वक्तव्य देशाच्या सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल तर नाही ना? एका चाहत्याने म्हटलेय की ‘यह मोदी की महंगाई से रिलेटेड है क्या?’ अमिताभ बच्चन नेहमीच आपल्या सिनेमांविषयी, त्यातील आशयाबद्दल माहिती देत असतात. अलिकडेच त्यांनी गुलाबो सिताबो या चित्रपटाचे एक ट्विट शेअर केलंय. शुजित सरकारचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात ते आयुष्यमान खुराणा सोबत काम करताना दिसतील. तेव्हा हा चित्रपट राजकारणावर आहे का? असा प्रश्न एका चाहत्याने उपस्थित केला आहे.