शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 23 मे 2019 (18:33 IST)

जेव्हा सनी लिओनीने अर्नबला विचारले ’मी किती मतांनी आघाडीवर आहे?’

sunny leone tweet to arnab goswami
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यावर सगळ्या चॅनल्सवर सतत निकालाचा अंदाज देण्यात येत आहे. अशात क्षणोक्षणांच्या अपडेट्स देताना एंकरकडून घाईघाईत चूक होणे सामान्य असले तरी एखादी चूक व्हायरल झाली की कशी मजा येते हे बघा. 
 
निकालाच्या अशाच एका चर्चेदरम्यान उत्साहाच्या भरात एका एंकरने घाईघाईत भाजपचे उमेदवार सनी देओल यांचा उल्लेख सनी लिओनी असा केला. नंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावर बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने स्वत: ट्विट करून मजा आणखीच वाढवला.
 
‘रिपब्लिक’ चॅनलवर अनर्ब गोस्वामी ‘सनी लिओनी… असे म्हणत नंतर सनी देओल हे ७ हजार ५०० मतांनी आघाडीवर आहेत’ असे बोलले. हे घडल्यावर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अशी चूक झाल्यामुळे हातोहात व्हिडिओ शेअर करण्यात आला. नंतर सनी लिओनीने देखील ट्विटवरून अर्नबला विचारले की मी किती मतांनी आघाडीवर आहे?