1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2019 (18:04 IST)

जावेद अख्तर यांना करणी सेनेची धमकी

javed akhtar
सुप्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेदअख्तर यांनी बुरख्यावर बंदी घालण्याबरोबरच राजस्थानमधील घुंगटप्रथेवरही बंदी घालावी, महिला सक्षमीकरणासाठी ते आवश्यक आहे असं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं. मात्र जावेद अख्तर यांच्या या विधानावर करणी सेनेने नाराजी व्यक्त केली आहे. माफी मागा, अन्यथा घरात घुसून मारू अशी धमकी महाराष्ट्र करणी सेनेने जावेद अख्तर यांनी दिली आहे. 
 
महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी 'तीन दिवसांत माफी मागा, नाहीतर तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारू' अशी धमकी  जावेद अख्तर यांना दिली आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील करणी सेनेने पोस्ट केला आहे. 'आपल्या मर्यादा ओळखा. राजस्थान राज्याच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करू नका. जावेद अख्तर यांनी त्यांच्या वक्तव्यासाठी तीन दिवसांत माफी मागावी, अन्यथा करणी सेनेच्या विरोधाला सामोरं जावं' असं या व्हिडीओत म्हटलं आहे.