शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

जावेद अख्तर म्हणाले-केवळ बुरखा का, घूंघटवर का नाही

बुरखा यावर चर्चा करताना जावेद अख्तर यांनी म्हटले की बुरख्यावर बंदी लागल्यास सरकारने राजस्थानमध्ये घूंघटवर देखील बंदी घालावी हवी.  
 
भोपाळमध्ये प्रज्ञा ठाकुर यांच्या संदर्भात जावेद अख्तर म्हणाले की मोदींना सल्ला आहे की त्यांनी श्राप हाफिज सईद आणि इतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी करावे.
 
जावेद अख्तर यांनी प्रज्ञा ठाकुरवर हल्ला बोलत म्हटले की त्यांच्या श्रापामुळे जेव्हा एक देशभक्त ऑफिसर शहीद होऊ शकतो तर असे श्राप देशाच्या सुरक्षेसाठी वापरावे.  
 
त्यांनी म्हटले की भाजपने बहुतेक असहाय्य होऊन प्रज्ञा ठाकुर यांना तिकिट दिले असावे. असे करून भाजपने स्वत: पराजय स्वीकार केली आहे. अख्तर हे देखील म्हणाले की राहुल गांधींना ते भावी पंतप्रधान या रूपात बघत नाही.  
 
सूत्रांप्रमाणे बीजेपीवर टीका करत ते म्हणाले की लोक चुकीचे वागून स्वत:ला योग्य सिद्ध करतात. त्यांनी भाजप सत्ता असताना डेमोक्रेसीवर देखील प्रश्न केले. त्यांनी म्हटले की भाजपची विचारधारा आहे की तुम्ही आम्हाला साथ देत नसाल तर तुम्ही अँटी नॅशनल आहात. पण मी चौकीदार चोर, असली भाषा वापरण्याचे समर्थन करत नाही. राहुल यांना मी भावी पंतप्रधानाच्या रूपात बघत नाही. जावेद अख़्तर म्हणाले की 2019 निवडणुका देशासाठी महत्त्वपूर्ण आहे.