रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

दीपिका पादुकोणने सांगितले रणवीरचे बेडरूम सीक्रेट्स

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लग्नानंतर अनेकदा इव्हेंट्समध्ये सोबत दिसून येतात. अलीकडेच फेमिना ब्यूटी अवॉर्ड्समध्ये सामील होऊन दोघांनी आपल्या दांपत्य जीवनावर अगदी मोकळेपणाने चर्चा केली. या दरम्यान दीपिकाने रणवीरचे काही बेडरूम सीक्रेट्स देखील शेअर करून दिले.
 
दीपिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीपिका पादुकोणला रणवीर सिंहच्या ब्यूटी सीक्रेटबद्दल विचारण्यात आले तेव्हा दीपिका म्हणाली की रणवीर खूप वेळेपर्यंत शॉवर घेतो आणि खूप वेळ टॉयलेटमध्येच असतो.
 
सोबतच दीपिकाने हे देखील सांगितले की त्याला तयार व्हायला खूप वेळ लागतो. दीपिका म्हणाली की 'तो बेडवर खूप वेळ लावतो' यावर ऑडियंस हसू लागली. तेव्हा दीपिकाने आपली चूक दुरुस्त करत म्हटले की बेडवर झोपायला जाण्यासाठी देखील तो खूप वेळ घेतो. 
 
या दरम्यान रणवीरच्या कपड्यांवर देखील चर्चा झाली. तेव्हा दीपिका म्हणाली की रणवीर कपडे सिलेक्ट केल्यावर तिला दाखवतो आणि तिने अप्रूव केल्यावरच घालतो.