गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा फायदा

BBC voice activated bulletin from 15th April
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे प्रयत्न करत आहे. बीबीसी न्यूज व्हॉइस एक्टिवेटेड बुलेटिन घेऊन येत आहे. या व्यतिरिक्त चॅटबॉट टेक्नॉलॉजीसह प्रयोग केले जात आहे. आणि फेक न्यूज थांबवण्यासाठी त्यांनी फॅक्ट चेकिंग सर्व्हिस देखील सुरू केली आहे.
 
ही विशेष सामुग्री बीबीसी इंडियावर प्रस्तुत केली जाईल. बीबीसी इंडिया सहा भारतीय भाषा जसे हिंदी, गुजराती, मराठी, पंजाबी, तमिळ आणि तेलुगूमध्ये बातम्या देत आहे.
 
बीबीसी न्यूजचे जर्नलिस्ट, निवडणूक दरम्यान मतदारांची आकांक्षा, शासनाप्रती निराशा आणि भारताचे भविष्य अशा मुद्द्यांवर ध्यान केंद्रित करत निष्पक्ष आणि स्वतंत्र रूपाने गहन कव्हरेज, विशेष साक्षात्कार आणि एक्सपर्ट एनालिसिस प्रस्तुत करेल. या दरम्यान बीबीसी मतदानाच्या ट्रेंडवर लक्षपूर्वक निरीक्षण करेल आणि गंभीर तार्किक विषयांवर तपशीलवार चर्चा करेल.
 
या कँपेन अंतर्गत बीबीसी वर्ल्ड न्यूज आणि बीबीसी डॉट कॉम अनेक मोठ्या स्टोरीज कव्हर करेल. या दरम्यान रोजगार, सुरक्षा, राष्ट्रवाद, ग्रामीण वोट, धर्म, तरुण मतदाता आणि महिलांविरुद्ध हिंसा सारख्या गंभीर विषयांवर  विश्लेषण प्रस्तुत केलं जाईल.
 
बीबीसी 15 एप्रिलला हिंदीत प्रथम व्हॉइस एक्टिवेटेड बुलेटिन लाँच करत आहे. यूजर्स या द्वारे बीबीसी निवडणूक समाचार कव्हरेज याशी जुळले राहतील आणि क्षणाक्षणाच्या बातम्या त्यांना मिळत राहतील. या प्रकारे 16 एप्रिलला बीबीसी इंडिया फेसबुकच्या मेसेंजर प्लेटफॉर्मवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये एक प्रायोगिक इंटरॅक्टिव्ह निवडणूक चॅटबॉट सादर करेल.