मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जानेवारी 2020 (15:19 IST)

कतरिना-विकी करतात एकमेकांना डेट?

बॉलिवूडमध्ये सतत कोणत्या न कोणत्या विषयांवर चर्चा सुरू असतात. आता चर्चा रंगत आहे ती म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या नात्याची. एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान विकीने सलमानसमोर  
कतरिनाला लग्नाची मागणी घातली होती. 'माझ्यासोबत लग्न करशील का?' या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली 'आता माहित नाही.' या दिवसानंतर त्यांच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच रंगू लागल्या. दोघेही उद्योगपती अंबानींच्या पार्टीमध्ये देखील एकत्र झळकले होते. आता पुन्हा कतरिना आणि विकीला एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. 
 
कटरिना अणि विकी निर्माती आरती शेट्टीच्या घरी भोजनासाठी उपस्थित होते. यावेळेस जरी ते दोघे वेग-वेगळ्या कारमधून आले असले तरी त्यांच्यात लाल गुलाब बहरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याठिकाणी कतरिना मेकअप शिवाय तर विकी काळ्या रंगाच्या टीशर्टमध्ये दिसला होता. करणच्या शोमध्ये कतरिनाने विकीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आतार्पंत विकी-कतरिनाने एकत्र स्क्रिन शेअर केलेली नाही.