रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 7 जानेवारी 2020 (10:39 IST)

अक्षयकुमार ठरला किंग

बॅक-टू-बॅक ब्लॉकबस्टर्स चित्रपट देणारा बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षयकुमार पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसचा किंग ठरला आहे. गतवर्षी त्याचे केसरी, मिशन मंगल, हाऊसफुल 4 आणि गुड न्यूज सारख्या चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत अन्य कलाकारांना मागे टाकले. अक्षयच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एकूण 665.89 कोटी रुपयंचा व्यवसाय केला आहे. अक्षयने मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या 'केसरी' चित्रपटाने सुमारे 151.87 कोटींची कमाई केली होती.
 
'केसरी'च्या यशानंतर 'मिशन मंगल' या चित्रपटालाही प्रेक्षकांनी भरभरून दिले. 'मिशन मंगल'नेही 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आणि एकूण 192.66 कोटी कमाई या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा चौथा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आला. या विनोदी चित्रपटाने 205.60 कोटींच्या उलाढालीसह गतवर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्यानंतर अक्षयच्या 'गुड न्यूज' चित्रपटाने अवघ्या सहा दिवसांत 115.75 कोटी कमाविले.