मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 2 जानेवारी 2020 (14:24 IST)

नीना गुप्तांच्या सिनेमाला ऑस्कर नामांकन

Oscar nomination for Nina Gupta's movie
सेलिब्रिटी शेफ ते फिल्ममेकर असा प्रवास करणार्‍या विकास खन्ना यांचा पहिलाच सिनेमा 'द लास्ट कलर'ला ऑस्कर पुरस्कारातील फीचर फिल्म यादीत नामांकन मिळाले. स्वतः विकास यांनी सोशल मीडिावर याची माहिती दिली. विकासने आपल्या ट्विटरवर लिहिले की, '2020 ची सर्वात चांगली सुरुवात.
 
जादू.. ऑस्कर अकादमीने 2019 मधील सर्वोत्तम 344 सिनेमांची घोषणा केली. यात 'द लास्ट कलर' सिनेमाचा समावेश आहे. सारंना धन्यवाद. 'लास्ट कलर' सिनेमातील अभिनेत्री नीना गुप्ता यांनी विकास यांच्या ट्विटला रीट्विट करत म्हटले की, 'माझा विश्वास बसत नाही. मी खूप आनंदी आहे.' सिनेमा भारतात अजून प्रदर्शित झालेला नाही.