1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (11:33 IST)

अखेर कबुली दिली!

Finally confessed!
बॉलिवूडचा तरुण हँडसम कलाकार कार्तिक आर्यन याने अखेर सारा अली खानची सावत्र आई करिना कपूरच समोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. माझे सारावर प्रेम आहे, असे त्याने स्पष्ट केले आहे. एका शोदरम्यान कार्तिकला करिनाने त्याच्या आवडत्या तीन अभिनेत्रींची नावे कोणती असा प्रश्र्न विचारला होता. 
 
त्यावर त्याने दिलेले उत्तर खूप वेगळे होते. कार्तिक म्हणाला, तीनपैकी एकीला मी ब्लॉक करतो, एक माझ्या फ्रेंड झोनमध्ये आहे आणि एक मला खूप आवडते. कार्तिकला सारा आवडते, नुसरत भारुचाला त्याने ब्लॉक केले आणि कृती सेनन ही त्याची केवळ मैत्रीण आहे. कार्तिक म्हणाला की, मी मनापासून केल्या जाणार्‍या प्रेमावर विश्वास ठेवणारा आहे. मी कोणतेही डेटिंग अ‍ॅप वापरत नाही. केवळ खर प्रेमावरच माझा विश्र्वास आहे. त्याचे खरे प्रेम साराच आहे, हे त्याने वरील उत्तरातून सूचित केले आहे.