सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 25 डिसेंबर 2019 (15:31 IST)

एका इन्स्टा पोस्टसाठी इतके कोटी घेते प्रियंका

बॉलिवूड कलाकारांच्या कमाईचा मुख्य स्रोत हा सिनेमा आणि जाहिराती हा असतो. पण याशिवाय सध्या आणखी एक गोष्ट त्यांच्या कमाईचा मुख्य स्रोत ठरत आहे. ते म्हणजे त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्ट. बॉलिवूडमधील अनेक कलाकार सध्या त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टचच्या माध्यमातून करोडो रुपयांची कमाई करत आहेत. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी 40-50 लाख रुपये चार्ज करतात. अमिताभ बच्चन सर्वात जास्त त्यांच्या ट्विटरवरून सक्रिय असतात. 
 
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक सक्रिय असणार्‍या आलिया भटनं फक्त इन्स्टाग्राचम नाही तर स्वतःचं युट्यूब चॅनलही सुरू केलं आहे. ती एका पोस्टसाठी 1 कोटी रुपये घेते. अभिनेत्री प्रियंका चोप्राचे इन्स्टाग्रावर 40 मिलिलिनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी 1.87 कोटी रुपये चार्ज करते.
 
अभिनेता शाहरुख खान मागच्या काही काळापासून सिनेमांपासून दूर आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या  कॅलिफोर्निया व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हारल झाले होते. शाहरुख एका पोस्टसाठी 80 लाख ते 1 कोटी रुपये चार्ज करतो. 'कबीर सिंह' सिनेमानंतर शाहिद कपूरच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली. अनेक‍ निर्मात्यांची त्याच्यकडे रांग लागली आहे. शाहिद एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी 20 ते 30 लाख रुपये चार्ज करतो. नेहा धुपिया प्रेग्रन्सीनंतर सिनेमांपासून दूर असली तरीही ती सोशल मीडिावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे असंख्य चाहते आहेत. ती एका पोस्टसाठी 1.5 लाख रुपये चार्ज करते.