शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 23 डिसेंबर 2019 (16:11 IST)

श्रेया पिळगावकरने घेतले पंजाबीचे धडे

Punjabi lessons taken by Shreya Pilgaonkar
बॉलिवूडमध्ये सध्या भंगडा पा ले या चित्रपटाची खूपच चर्चा सुरू असून या चित्रपटाची प्रेक्षकांना खूपच
उत्सुकता लागली आहे. यात सनी कौशल आणि रुख्शार ढिल्लन मुख्य भूमिका साकारत असून मराठोळी
अभिनेत्री श्रेया पिळगावकरही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात श्रेया एका पंजाबी मुलीच्या  
भूमिकेत झळकणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी मराठोळी असलेल्या श्रेयाने खूपच मेहनत घेतली
आहे. पंजाबी पेहरावापासून ते पंजाबी भाषा बोलण्यासाठी श्रेयाने याचे बारकावे समजून घेतले आहेत. तसेच
पंजाबी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी ती सातत्याने सराव करत आहे. ज्यामुळे तिच्या भूमिकेला योग्य न्याय मिळू शकेल.

दरम्यान, चित्रपटातील पेग शेग हेगाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. यात सनी कौशल आणि रुख्शार ढिल्लनची डान्सवरून सुरू असलेली जुगलबंदी पाहणस मिळते. या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आरएसव्हीपीव्दारा निर्मित भांगडा पा लेचे दिग्दर्शन स्नेहा तौरानी यांनी केले आहे. हा चित्रपट नवीन वर्षाच्या प्रारंभीच प्रेक्षकांच भेटीला येणार आहे.