गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (15:13 IST)

हिंदीसह आणखी दोन भाषेत रिलीज होणार 'स्ट्रीट डान्सर'

'Street Dancer' to be released in two more languages
लवकरच बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' हा चित्रपट येणार असून 'एबीसीडी' सिरीजचा तिसरा भाग असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रोमे डिसूझा हे करत आहेत. लवकरच चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषेतही रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्णन कुमार आणि लिझेले डिसुजा हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून माहिती दिली आहे. वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही यांचे फर्स्ट लूक सोशल मीडिावर शेअर करण्यात आले आहेत. त्यांच्या लूकवरून या चित्रपटात डान्सची जबरदस्त स्पर्धा रंगणार असल्याचा अंदाज येतो.