रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 18 डिसेंबर 2019 (10:49 IST)

सईमुळे 'दबंग 3'साठी लागला 7 वर्षांचा कालावधी

सलमान खानचा आगामी 'दबंग 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दबंग सीरिजमधील हा तिसरा चित्रपट असून यापूर्वी 2012 मध्ये 'दबंग 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'दबंग 2' पाहिल्यानंतर सलमानचे चाहते 'दबंग 3'ची आतुरतेने वाटत पाहत होते. मात्र 'दबंग 3' साठी चाहत्यांना तब्बल सात वर्ष प्रतीक्षा करावी लागली. अलीकडेच सलमानने 'कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना 'दबंग 3' च्या निर्मितीसाठी सात वर्ष का लागली मागचं कारण सांगितलं.
 
'दबंग 2' प्रमाणेच 'दबंग 3' मध्येदेखील सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. सईचा हा डेब्यू चित्रपट असून तिच्यामुळे चित्रपटाच्या निर्मितीला सात वर्षांचा कालावधी लागला. या चित्रपटातून सई पहिल्यांदाच डेब्यू करत होती. त्यामुळे तिच्या  तयारीसाठी आम्हाला वेळ हवा होता. भूमिकेला न्याय देण्यासाठी ती प्रॉपर डाएट आणि वर्कआऊट करत होती. त्यामुळे आम्हाला हा चित्रपट करण्यासाठी 7 वर्षांचा अवधी लागला, असं सलमानने सांगितलं.