सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (16:17 IST)

रणवीर म्हणतो, 'मला बाबा व्हायचं'

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी सिंधी पद्धतीने लग्रगाठ बांधली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली ही जोडी सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. त्यातच रणवीरने त्याला बाबा होण्याची  इच्छा असल्याचं एका कार्यक्रमात सांगितलं. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांची चर्चा रंगू लागली आहे. रणवीरचं दीपिकावर किती प्रेम आहे हे सार्‍यांनाच  ठावूक आहे. 
 
रणवीरचं केवळ दीपिकावर प्रेमच नाही तर तो तिची काळजीही तितकीच घेतो. अलीकडेच रणवीरने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्वाने मला बाबा व्हायचं आहे असं सांगितलं. माझी मनापासून बाबा होण्याची इच्छा आहे. मला माझ मुलांसोबत क्वालिटी टाइम व्यतीत करायचा आहे, असं रणवीर यावेळी म्हणाला. तसंच त्याने त्याच्या करिअर विषीही काही गोष्टींचा उलगडा केला. मला अभिनया व्यतिरिक्त चित्रपटाचं दिग्दर्शन करायलाही आवडेल. तसंच मला लेखन करायलासुद्धा आवडतं. फावल्या वेळात मी काही ना काही लिहीत असतो, असंही तो म्हणाला. दरम्यान, लवकरच रणवीरची मुख्य भूमिका असलेला '83' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तो तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.