बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 16 डिसेंबर 2019 (11:24 IST)

भूमीला कुणासोबत डेट करायचंय?

भूमी पेडणेकरचा करियर ग्राफ हा दिवसेंदिवस उंचावत चालला आहे. तिचा 'सांड की आँख' आणि 'बाला' या चित्रपटानी तिकीटबारीवर चांगले यश मिळवले आहे. आता तिचा 'पती, पत्नी और वो' हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाचा कळत नकळत परिणाम हा भूीवरही झालेला दिसून येतो. आता भूमीची नजर प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनासवर आहे. ही गोष्ट भूमीनेच सांगितली आहे.
 
अलीकडेच एका मुलाखतीत भूमीला प्रश्न विचारला की, आपल्याला कोणाशी डेट करावेसे वाटते. तेव्हा तिने केवळ निक जोनासचे नाव घेतले होते. जर मला बॉलिवूडच्या एखाद्या नटीच्या नवर्‍याबरोबर किंवा बॉयफ्रेंडवर डेट करणची संधी मिळाली तर मला प्रिंकाचा नवरा निक जोनासबरोबर डेट करण्यास  आवडेल. झालं, मग भूमी पेडणेकरबाबत गॉसिपला उधाण आले आहे. भूमी तुला 'वो' व्हायचे आहे. चित्रपटात तर तू पत्नी झाली आहेस, मग जोनासबरोबर डेट करायचे कारण काय? तो आवडत असला तरी एका अभिनेत्रीचा नवरा आहे, हे विसरू नको, अशा प्रकारच्या प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला आहे. अर्थात प्रियंका असताना आपल्याला 'वो' होणे सोपे जाणार नाही, हे तिला चांगलेच ठाऊक असेल.