मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 14 डिसेंबर 2019 (14:08 IST)

रजनीकांत यांना बालपणी साकारायला आवडाची 'ही' भूमिका

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे जगभरामध्ये असंख्य चाहते आहेत. रजनीकांत हे केवळ कलाकार नसून तमिळ चित्रपटातील ते एक दैवी नाव आहे. पडद्यावरील त्यांची स्टाइल, त्यांचा अ‍ॅटिट्यूड यांनी वेडावलेल्या चाहत्यांची संख्या लक्षणीय आहे. रजनीकांत यांनी पहिल्यांदा 1975 मध्ये आलेल्या 'अबूर्वा रांगणगल' या चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. त्यानंतर रजनीकांत नावाचे वादळच दाक्षिणात्य चित्रपटात आले जे आजतायगत घोंगावत आहे. दाक्षिणात्सोबतच त्यांनी बर्‍याच हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. आतापर्यंत त्यांनी दीडशेहूनही अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 
हिंदी चित्रपटसृष्टीतील 'अंधा कानून' हा त्यांचा पहिला चित्रपट. विशेष म्हणजे आजवरच्या कारकिर्दीत विविधांगी भूमिका करणार्‍या रजनीकांत यांना लहानपणी एक विशेष भूमिका करायला फार आवडायची. लहान असताना रजनीकांत यांना रावणाची भूमिका करायला प्रचंड आवडाचं. शाळेत होणार्‍या कार्यक्रमांमध्ये त्यांनी बर्‍याच वेळा रावणाची भूमिका साकारली आहे. शाळेत असल्यापासून रजनीकांत यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी शाळेत विविध नाटकांमध्ये काम केलं होतं. या नाटकांमध्ये त्यांनी बर्‍याच वेळा खलनाकाची भूमिका साकारली. त्यातही त्यांना रावणाची भूमिका करायला फार आवडायचं.