मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 डिसेंबर 2019 (10:49 IST)

‘तान्हाजी टिझर मराठीत प्रदर्शित, नेटवर जोरदार व्हायरल

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’  या चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाची हिंदीप्रमाणेच मराठीत देखील निर्मिती व्हावी अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता या चित्रपटाचा मराठी भाषेतील टिझर प्रदर्शित झाला आहे. काही वेळातच प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’च्या मराठी टीझरवर आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
 
‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत असून अभिनेत्री काजोल तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव आहे.

हा चित्रपट येत्या १० जानेवारी २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.