सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (16:33 IST)

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्राणांची बाजी लावून स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची हा ट्रेलर कसा असे असेल याची उत्सुकता होती.
 
कोंढाणा स्वराज्यात परत घेतल्या शिवाय मी चपला घालणार नाही, अशी जिजामातांची प्रतिज्ञा, मुघलांच्या तावडीतून कोंढाणा सोडवण्यासाठी छत्रपती शिवरायांची योजना सोबतच ती योजना प्राणांची बाजी लावून यशस्वी करणारे नरवीर तान्हाजी मालुसरे यांची कथा या ट्रेलरमधून समोर येते आहे. या  चित्रपटाचे संवाद दमदार झाले असून, ट्रेलरवरून प्रेक्षकांना अजयचा तान्हाजी आवडल्याचं दिसून येत आहे.
 
‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. तर तान्हाजी यांची पत्नी सावित्रीबाई यांच्या भूमिकेत अभिनेत्री काजोल दिसून येते आहे. सोबतच शरद केळकर, पद्मावती राव, सैफ अली खान, अजिंक्य देव, देवदत्त नागे हे कलाकारही यात विविध भूमिकांमध्ये असणार आहेत.  ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.