बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (10:43 IST)

प्रियंकाने केली फोटो काढतांना केली चूक

काही दिवसापूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने ने तिच्या कुटुंबियांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. मात्र फोटो काढण्याच्या गडबडीमध्ये प्रियांकाने एक चूक केली. विशेष म्हणजे प्रियांकाला तिची चूक लक्षात देखील आली नाही. परंतु फोटो पाहिल्यानंतर तिला ही चूक उमगली.
 
प्रियांका सध्या तिच्या आईसोबत वेळ घालवत असून यावेळी तिने आईसोबत काही नातेवाईकांची भेट घेतली. या भेटीचा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला. मात्र हा फोटो नीट पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे प्रियांकाने एका पायामध्ये चप्पल घातलीच नव्हती. मात्र तरीदेखील तिने फोटो काढला. सध्या चाहत्यांमध्ये तिच्या या फोटोचीच चर्चा सुरु आहे. प्रियांका चप्पल घालायची विसरली की काय? असा प्रश्न चाहते प्रियांकाला विचारत आहेत.