सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (13:03 IST)

करण जोहर ने हॉलिवूड सिंगर कॅटी पेरीसाठी ठेवली पार्टी, आलिया-ऐश्वर्याने सोबत काढले फोटो

करण जोहरला बॉलीवूडचा पार्टी किंग म्हणतात. तो बॉलीवूड स्टार्ससाठी अनेकदा आपल्या घरी पार्टी करत असतो. यावेळी करणने हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कॅटी पेरीसाठी एक शानदार पार्टीचे आयोजन केले होते. केटी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित संगीत महोत्सवात परफॉर्म करण्यासाठी भारतात आलेली आहे.

करण जोहरने केटीसाठी आपल्या घरी वेलकम पार्टी आयोजित केली. बॉलीवूडमधील अनेक बड्या सितारांनाही इथे आमंत्रित केले. या स्टार्सपैकी ऐश्वर्या राय, अनन्या पांडे, सनाया कपूर, मलायका अरोरा, आलिया भट्ट आणि जॅक्लीन फर्नांडिस हे प्रमुख होते.  

या सर्व अभिनेत्रींनी कॅटी पेरीबरोबर पोझ दिला होता. पार्टीचे आतले फोटो समोर आले आहेत. काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये कॅटी आलिया आणि कारणाशी बोलत आहे. दुसर्‍या व्हिडिओमध्ये कॅटी शाहरुख खानची पत्नी गौरीशी बोलत आहे.
याआधी, कॅटी वर्ष 2010 मध्ये देखील भारतात आली होती. राजस्थानमध्ये तिने रसेल ब्रँडशी लग्न केले होते. तथापि, हे दोघे आता एकत्र नाहीत. त्याशिवाय २०१२ मध्ये चेन्नईत (IPL)आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यातही कॅटीने परफॉर्म केले होते. कॅटी 16 नोव्हेंबरला प्रथमच मुंबईत कॉन्सर्ट करणार आहे.