सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (15:25 IST)

शिल्पा होती 13 वर्ष बॉलिवूडपासून दूर, कारण.. ..

बॉलिवूडची फिट गर्ल' अर्थात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा गेल्या काही वर्षांमध्ये कलाविश्र्वातील वावर कमी झाला. मात्र या काळामध्ये ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात होती. असं असलं तरीदेखील शिल्पाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता यावं अशी चाहत्यांची प्रचंड इच्छा होती. विशेष म्हणजे चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. शिल्पा लवकरच सब्बीर खान यांच्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. 
शिल्पा 2007 साली 'लाइफ इन मेट्रो' आणि 'अपने' या चित्रपटांमध्ये अखेरची झळकली होती. या चित्रपटांमध्ये तिची मुख्य भूमिका होती. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटाध्ये झळकली नाही. मात्र आता तब्बल 13 वर्षांनंतर ती कमबॅक करणार आहे. सब्बीर खान यांच्या आगामी 'निकम्मा' या चित्रपटामध्ये शिल्पा झळकणार आहे. मी कलाविश्र्वाचा एक भाग आहे आणि मी जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरीदेखील या इंडस्ट्रीचा एक भाग म्हणूनच राहीन. ज्यावेळी तुम्ही लाइमलाइट मिस करता त्यावेळी तुम्हाला खर्‍या अर्थाने कलाविश्र्वाची आठवण येते.
Photo : Instagram

तुम्हाला अचानकपणे वाटतं की तुम्ही एखादी गोष्ट गमावत आहात आणि लोकांना तुमचा विसर पडत चाललाय. परंतु ही भावना माझ्या मनात कधीच नव्हती. कारण मी सतत या ना त्या कारणामुळे छोट्या पडद्यावर काम करत होते. मात्र बॉलिवूडपासून काही काळ दूर जाण्याचा निर्णय मी माझ्या मर्जीने घेतला होता, असं शिल्पा म्हणाली.