गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. अडगुलं मडगुलं
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (12:38 IST)

विश्व निमोनिया दिवस : निमोनियाचे बालरोगावर नैसर्गिक उपचार

निमोनियाची सुरूवात झाली की ताप, खोकल्याने लहान मुले परेशान होऊन जातात. मुळात त्यांची रोग प्रतिकारकशक्ती कमकुवत असल्याने आजार हा कमी होण्याऐवजी वाढतो. त्यांच्या छातीच्या फसल्याही एकसारख्या दुखत असतात. त्यामुळे त्यांना मातेचे दूध पिण्यास त्रास होत असतो. त्यांचे शरीर हे निळे पडत असते.
 
निमो‍निया मुख्यत: जीवाणू, विषाणू फंगस आदीमुळ होतो. ही लागण श्वासोच्श्वासामुळे होत असते. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमी व कार्बनडायऑक्साईडची वाढ होत असते. आता बालरोगांवर नैसर्गिक उपचार पध्दतीचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. त्यामुळे मुलांना त्याचे साईडइफेक्टस् ही होत नाहीत. 
 
नैसर्गिक उपचार:
1) सहा महिन्यांपासून 12 महिने वयोगटातील मुलांना थंड हवेमुळे सर्दी लागली असेल, छातीमध्ये कफ असेल, छातीमध्ये दुखत असेल किंवा फसली दुखत असेल तर अर्धा कप पाण्‍यात 10-12 दाणे ओव्याचे टाकून त्याला उकळावे. नंतर ते गाळूण घ्यावे. तयार झालेला ओव्याचा काढा थोडा कोमट करून दिवसातून दोन वेळा बाळाला एक- एक चमचा पाजावा. अथवा रात्री झोपताना द्यावा. ओव्याचा कुच्चा बाळाच्या मस्तकावर लावावा. 
2) बाळाची फसली दुखत असल्यास दूधामध्ये पाच तुळशी पत्रे व लौंग टाकून उकळून घ्यावे. ते थंड झाल्यानंतर बाळाला पाजावे. त्याने त्यास आराम पडतो. 
3) लहान मुलांना निमोनिय झाल्यास सरसोच्या तेलात तारपनीचे तेल मिसळून छाती तसेच पासरकुड्यांची दिवसातून दोन वेळा मालिश करावी. 
4) बाळाला निमोनिया झाल्यास चिमुटभर हिंग पूड पाण्यात मिसळून पाजल्यास छातीमधील साचलेला कफ निघून जातो. 
5) टारपनीचे तेल, कपुर आणि सरसोचे तेल एकत्र मिसळून बाळाच्या छातीची हल्क्या हाताने मालिश करावी.
6) निमोनिया झालेल्या बाळाला थंड पाणी, फळे खाण्‍यास देऊ नये. 
7) भुक लागल्यास हलके जेवन, दाळ, चपाती तसेच हिरवेपाले भाज्यांचे पाणी बाळास द्यावे.