गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

ATM धारकांना धोका, अकाउंटहून उडू शकतात पैसे

जर आपणही ATM वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. कारण आता आपल्याला खूप सावध राहण्याची गरज आहे नाहीतर आपल्या आविष्यभराची कमाई काही सेकंदात होतीची नव्हती होऊ शकते. कारण उत्तर कोरिया आपल्या एका Malware म्हणजे व्हायरस द्वारे भारतातील एटिएम यूजर्सचा डेटा चोरी करत आहे.
 
या मालवेयर बद्दल कॅस्परस्काई ग्लोबल रिसर्च ऍड एनालिसिस टीमच्या सिक्योरिटी रिसर्चर यांनी माहिती दिली आहे. त्यांच्याप्रमाणे भारतीय एटिएम यूजर्सवर हे मालवेयर अटॅक Lazarus ग्रुप द्वारे केलं जात आहे. उल्लेखनीय आहे की या ग्रुपचा हेतू पैसे चोरणे आहे.
 
उल्लेखनीय आहे की लजारस ग्रुपचं नाव आधीही 2014 मध्ये समोर आले होतं जेव्हा या ग्रुपने सोनी पिक्चर्स इंटरनटेनमेंटवर मालवेयर हल्ला केला होता. या ग्रुपने वर्ष 2016 मध्ये अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये रॅन्समवेअर अटॅक केलं होतं.
 
कॅस्परस्काई रिसर्चर्सने ATMDtrack मालवेयर बद्दल माहिती काढली जे एक बँकिंग मालवेयर आहे. हे मालवेयर वर्ष 2018 पासून भारतीय एटिएम यूजर्सला टार्गेट करत आहे. सिक्योरिटी रिसर्चर्स टीमप्रमाणे हे मालवेयर एटिएम कार्डमध्ये प्लांट केलं जातं. आणि त्यानंतर हे कार्ड आणि पिन संबंधी माहिती रेकॉर्ड करतं. यानंतर प्राप्त डेटाच्या आधारावर बँक खात्यातून पैसे गायब केले जातात.
 
Malware हे देखील सांगतं की ATM मध्ये आपण कधी कोणतं पिन टाकलं आहे. या व्यतिरिक्त हे मालवेयर रिमोटली देखील काम करतं. अर्थात लांब बसलेला व्यक्ती देखील आपलं एटिएम कंट्रोल करू शकतो.