शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 (13:05 IST)

जर तुमच्या एंड्रॉयड फोनमध्ये आहे हे लोकप्रिय अॅप तर लगेचच डिलिट करा

तुमच्या पैकी बरेच लोक डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी स्कॅनर अॅपचा वापर करत असतील. स्पॅनर अॅपमध्ये CamScanner चे मोठे नाव आहे. कॅमस्कॅनर अॅपची लोकप्रियता तुम्ही या गोष्टीवरूनच लावू शकता की एंड्रॉयडवर या अॅपला 10 कोटींपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहे, पण आता या अॅपबाबत सिक्योरिटीला घेऊन बरेच प्रश्न उठू लागले आहे. ओपन सोर्स प्लॅटफॉर्म असणाऱ्या गुगल प्ले स्टोअरवरील सर्वात लोकप्रिय अॅप्लिकेशनपैकी एक असणाऱ्या कॅमस्कॅनर अॅप्लिकेशनमध्ये मालवेअर असल्याचे स्पष्ट झाले आहे. कागदपत्रांचे पीडीएफ, जेपीजी इमेजेस बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅम स्कॅनर अॅप्लिकेशनमध्ये व्हायरस असल्याची माहिती सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या ‘कासपर्सस्की’ या रशियन कंपनीने आपल्या युझर्सला ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे.  
 
सिक्योरिटी फर्म Kaspersky लॅब्सने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की या CamScanner अॅपमध्ये मालवेअर (वायरस) आहे, पण रिपोर्टमध्ये असे ही सांगण्यात आले आहे की कॅमस्कॅनर अॅप काही मैलवेयर अॅप नसून तुमच्या फोनमध्ये कुठलेही वायरस असणारे अॅप इंस्टॉल करतो पण मागील काही महिन्यांपासून कंपनीने अॅपला   ऑप्टिमाइज केले आहे.   
 
अशात जाहिरात कंपन्यांना कंपनीने या अॅपला विकत घेण्याचा विकल्प दिला आहे. कॅमस्कैनरचे नवीन व्हर्जनची एडवरटाइजिंग लायब्रेरीमध्ये एक मालवेअर मॉड्यूल आहे ज्याची ओळख Trojan-Dropper.AndroidOS.Necro.n च्या स्वरूपात झाली आहे.  
 
हे मालवेअर तुमच्या फोनमध्ये वायरस असणारे अॅप डाउनलोड्स करू शकतो. तसेच हे तुमच्याकडून विज्ञापनच्या माध्यमाने पैसे देखील मागू शकतो. ही रिपोर्ट समोर आल्यानंतर देखील गूगलने प्ले-स्टोअरमधून या अॅपला अद्याप हटवले नाही आहे. सांगायचे म्हणजे की गूगलने नुकतेच प्ले-स्टोअरची अॅप पब्लिशिंग पॉलिसीमध्ये काही बदल केले आहे. नवीन नियमांनुसार कुठलेही डेव्हलपर लगेचच अॅप पब्लिश नाही करू शकत.