शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (14:48 IST)

गूगलने मोडली एंड्रॉयड वर्जनचे नाव मिठाईवर ठेवण्याची 10 वर्षाची जुनी परंपरा

गूगलने एंड्रॉयड वर्जनचे नाव मिठाईच्या नावावर ठेवण्याची 10 वर्षाची जुनी परंपरेला संपुष्टात आणले आहे. आता एंड्रॉयडच्या पुढील वर्जनचे नाव एंड्रॉयड 10 असेल. नाव बदलल्याबद्दल गूगलने म्हटले आहे की देश मिठाईच्या नावाबद्दल फारच दुविधेत राहत.
 
अशात एंड्रॉयड वर्जनचे नाव संख्येत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गूगलने एंड्रॉयड 10 बद्दल एक व्हिडिओ काढला आहे आणि तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला देखील नवीन नावाने अपडेट केले आहे. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत एंड्रॉयड वर्जनचे सर्व नाम कोणत्या ना कोणत्या मिठाईच्या नावावरच होते, पण एंड्रॉयड 10 सोबत असे होणार नाही.
 
उमेद आहे की लवकरच एंड्रॉयड 10 चा बीटा वर्जन काढण्यात येईल. तसेच कंपनीने एंड्रॉयडच्या लोगोमध्ये देखील बदल केला आहे. आधी एंड्रॉयड, आयकनच्या उजवीकडे  लिहिलेले असायचे आता तो आयकन खाली आले आहे.
 
कपकेक होते एंड्रॉयडच्या पहिल्या वर्जनचे नाव 
सांगायचे म्हणजे की एंड्रॉयडचा पहिला वर्जन 1.5 होता ज्याला कपकेक नाव देण्यात आले होते आणि हे नाव कंपनीच्या एका प्रोग्रॅम मॅनेजराने दिले होते. कपकेक अंग्रेजी अल्फाबेटच्या अक्षर सी पासून सुरू होतो. त्यानंतर जेवढे वर्जन लाँच झाले त्याचे नाव अल्फाबेट पुढील अक्षरावर ठेवण्यात आले. जसे - कपकेकनंतर डोनट (डी), इक्लेयर (इ) इत्यादी लाँच झाले. नवीन वर्जनचे नाव एंड्रॉयड क्यूच्या जागेवर एंड्रॉयड 10 निश्चित झाले आहे.
 
या स्मार्टफोनला मिळेल एंड्रॉयड 10 चा अपडेट
एंड्रॉयड 10चा सर्वात पहिला अपडेट गूगल पिक्सल 3, पिक्सल 2, पिक्सल आणि पिक्सल 3ए सारख्या फोनला मिळेल. एकूण सांगायचे झाले तर सर्व पिक्सल फोनमध्ये एंड्रॉयड 10चे अपडेट मिळेल.  
 
नोकियाच्या फोनमध्ये देखील मिळेल एंड्रॉयड 10चा अपडेट
एचएमडी ग्लोबलने देखील एंड्रॉयड 10 च्या अपडेटबद्दल लिस्ट काढली आहे. कंपनीने दिलेल्या वृत्तानुसार Nokia 7 Plus, Nokia 6.1 Plus,  आणि Nokia 6ला आधी  अपडेट मिळेल. त्यानंतर नोकियाचे इतर फोनला 2020च्या पहिल्या त्रैमासिकामध्ये एंड्रॉयड 10 चा अपडेट मिळेल.