सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

WhatsApp Gold virus: व्हाट्सअॅप यूजर्ससाठी धोक्याची चाहूल, या प्रकारे राहा सुरक्षित

व्हॉट्सअॅपवर नवीन व्हायरस आला आहे. याचे नाव व्हॉट्सअॅप गोल्ड आहे. खरं म्हणजे व्हॉट्स अॅप गोल्ड एक बोगस मेसेज आहे. या मेसेजमध्ये वापरकर्त्याला विशेष फीचर्ससह व्हॉट्सअॅप स्पेशल व्हर्जन दाखवून लोभ दाखवला जातो. मेसेजमध्ये व्हॉट्सअॅप गोल्ड याला व्हॉट्सअॅपचे अपग्रेड व्हर्जन असल्याचे सांगितलं जातं.
 
मेसेजमध्ये यूजर्सला सांगितले जातं की व्हॉट्सअॅप गोल्डमध्ये आपण एकाच वेळेस 100 चित्र पाठवू शकता आणि आपल्याला नवीन इमोजी देखील मिळतील. सोबतच पाठवलेले मेसेज कधीही डिलीट करता येतील आणि व्हिडिओ चॅट होल्ड करू शकता.
 
व्हॉट्सअॅप गोल्ड व्हायरसमुळे आपली खाजगी माहिती चोरीला जाते. व्हाट्सअॅप गोल्ड डाउनलोड करण्यासाठी एक लिंक पाठवली जाते. लिंकवर क्लिक केल्याक्षणी वापरकर्ता त्या मॅलवेयर करप्ट असलेल्या वेबसाइटवर पोहचतो अर्थात या वेबसाइटवर अनेक व्हायरस असतात. मॅलवेयर सॉफ्टवेयर आपल्या फोनमधील मेसेज आणि इतर खाजगी डेटा चोरी करतं. यात आपल्या बँक डिटेल्सदेखील चोरी जातात.
 
व्हॉट्सअॅपप्रमाणे त्यांच्याकडून कुठलेलही गोल्ड व्हर्जन लाँच केले गेले नाही. अशात ही कृत्य हँकर्सचे असून आपण हा मेसेज उघडल्यास आपल्या फोनमध्ये देखील व्हायरस लागू शकतं आणि आपली खाजगी माहिती लीक होऊ शकते. यापासून बचावाचा सर्वोत्तम पर्याय आहे की आपल्याकडे व्हॉट्सअॅपचे अपग्रेडेड फीचर्ससाठी मेसेज आल्यास त्यावर क्लिक करू नका. तसेच या प्रकाराचे मेसेज फॉरवर्डदेखील करणे टाळा.