गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा गंडा

Pune cosmos bank cyber attack
पुणे- पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यलयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये लंपास करण्यात आले आहे. हॅकर्सने ट्राजेक्शनद्वारे हे रुपये काढण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही रक्कम हॉंगकॉंग येथील एका बँकेत वळविण्यात आली आहे.
 
याप्रकरणी सुभाष गोखले (वय 53) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हॉंगकॉंग येथील ए. एल. एम. ट्रेंडिंग लिमिटेड कंपनी आणि अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास हॉकर्सनी बँकेचे सर्व्हर हॅक केले. त्यानंतर जवळपास 78 कोटी रुपयांची रक्कम भारताबाहेर वळविण्यात आली. तर 2 कोटी 50 लाखांचे ट्राजेक्शन भारतात झाले आहे. असे ऐकून 80 कोटी 20 लाख रुपये विसा आणि एन.पी.सी.आयद्वारे केलेले ट्राजिक्शन अज्ञात व्यक्तीने अप्रुवल करून काढले. त्यानंतर 13 ऑगस्टला हॉकर्सनी सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास हॉंगकॉंग येथील बँकेत 14 कोटी रुपयांचे ट्राजिक्सन केले आहे. 
 
पुणे शहरात इतक्या मोठ्या प्रामाणत फसवणुक होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.