सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

एसबीआयला पहिल्या तिमाहीत तोटा

स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) पहिल्या तिमाहीत तोटा झाला आहे. एसबीआयने २०१८-१९ या वर्षातील (एप्रिल- जून) पहिल्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीची आकडेवारी जाहीर केली. या काळात बँकेला ४,८७५.७५ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे, असे एसबीआयने म्हटले आहे. बँकेला तोटा सहन करावा लागला असला तरी बँकेची उलाढाल वाढली आहे.
 
गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ७,७१८.१७ कोटी रुपयांचा तर तिसऱ्या तिमाहीत २,४१६ कोटी तोटा झाल्याचे बँकेने जाहीर केले होते. आता सलग तिसऱ्यावेळा बँकेला तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत २,००५.५३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचे बँकेने नमूद केले होते. मात्र त्यानंतर बँकेची कामगिरी तोट्यात गेली.