रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच बॅंकेने पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. बॅंक मॅनेजमेंटने गेल्या एका आठवड्यात सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सीबीआय सातत्याने बॅंकेतील कर्मचाऱ्यांना अटक करत असताना या बदल्या करण्यात आल्या. याबाबतची  ट्रान्सफर लिस्ट बुधवारी २१ फेब्रुवारीला बाहेर आली. केंद्रीय सतर्कता आयोगाच्या ऑर्डरनुसार बॅंकेने कारवाई सुरू केली. 
 
सीव्हीसीने मंगळवारी बॅंकांसाठी अॅडवायजरी जाहीर करण्यात आली. यात असे लिहिले आहे की,  २१ फेब्रुवारीपर्यंत ३ वर्षांहून अधिक काळापर्यंत एकाच पोस्टवर असणाऱ्या ब्रॅंचमधील ऑफिसर्स आणि ५ वर्षांहुन अधिक काळापर्यंत एकाच बॅंकेत काम करणाऱ्या क्लार्क यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानंतर बदलीची प्रक्रिया सुरू झाली.