मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (14:59 IST)

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा : तिघांना अटक, बँकेचे १८ कर्मचारी निलंबित

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना  न्यायालयात करणार हजर करण्यात येणार आहे. मनोज खरात, हेमंत भट, बॅंकेचे उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी या तिघांना अटक करण्यात आले आहे. दरम्यान, पीएनबी अपहारप्रकरणी १७  ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. बँकेचे १८ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.  दरम्यान, याआधी हिरे व्यापारी नीरव मोदी परदेशात पळून गेलाय. तर नीरव मोदी आणि मेहूल चोकसीचा पासपोर्ट रद्द करण्यात आलाय. तसेच अपहारप्रकरणी तिघांविरोधात इंटरपोलची नोटीस बजावण्यात आली आहे.