1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (14:52 IST)

दोन मुली आणि पत्नीला विष देऊन व्यावसायिकाची आत्महत्या

suicide in maharashatra

पुण्यातील शिवणे येथील निलेश चौधरी या व्यवसायिकाने दोन मुलींना आणि पत्नीला विष दिले. तसेच स्वतः आत्महत्या केली आहे.  कर्जबाजारीपणा, नैराश्य या सगळ्याला कंटाळून सदरचे कृत्य केले आहे.  नैराश्यातून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट निलेश चौधरींच्या खिशात मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

निलेश चौधरी यांचा प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय होता.  त्यांनी पत्नी नीलम, मुलगी श्रिया आणि दुसरी मुलगी श्रावणी या तिघींना विष दिले. त्यानंतर पंख्याला दोरीने गळफास घेऊन स्वतःचेही आयुष्य संपवले. निलेश चौधरी यांचा मृतदेह पोलिसांना पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तर त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींचे मृतदेह बेडरुममध्ये आढळले. या सगळ्यांच्या तोंडातून फेस बाहेर आला होता. चारही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.