गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (14:58 IST)

संध्याकाळी पुणे कोर्टात डीएसके यांची हजेरी

डीएसके यांना ५ वाजता केले जाणार पुणे कोर्टात हजर केले जाणार आहे. पुणे न्यायालयातील न्यायाधीश उत्पात यांच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. याआधी दिल्ली येथून पहाटे ३ वाजता डिएसके यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. दरम्यान, डीएसकेंसोबत पत्नी हेमंतीही हिला ताब्यात घेण्यात आले.

संध्याकाळपर्यंत दोघांनाही पुण्यात आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाने यांनी दिलीय. शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांची चार पथकं डीएसकेंना अटक कऱण्यासाठी रवाना झाली होती. डीएसकेंविरोधात आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे 4 हजार तक्रारी अर्ज आले आहेत. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 284 कोटी 20 लाख 16 हजार 580 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलंय. तर पुणे पोलिसांकडे डीएसके यांनी कर्ज म्हणून वैयक्तिक घेतलेल्या रकमांसदर्भातही तक्रारी आल्या आहेत.