मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पीएनबी घोटाळा वाढला आकडा २० हजार कोटीच्या पुढे

आपल्या देशाला आर्थिक रीत्या हादरवून सोडणाऱ्या पीएनबी बँक  घोटाळ्याची व्याप्ती दिवसेन दिवस वाढत असून आता आकडा 20 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. हा नवीन अंदाज  आयकर विभागाने  वर्तवला आहे. या घोटाळ्याने  पीनएबी बँक चांगलीच अडचणीत सापडली आहे. या घोटाळा प्रकरणात नीरव मोदीच्या कंपनीचा चीफ फायनान्शियल ऑफिसर विपुल अंबानीची आज सलग दुसऱ्या दिवशी सीबीआय चौकशी सुरु आहे.
 
विपुल अंबानी रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा चुलतभाऊ आहेत असे समोर येतय.  सीबीआयनं मोठी कारवाई करत मुंबईतल्या पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस शाखेला बंद केले आहे. नीरव मोदी याने हा घोटाळा याच शाखेत केला आहे.  या घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
देशभरात एकूण ३९ छापे टाकण्यात आले असून जवळपास ५ हजार ७९० कोटी जप्त करण्यात आलेत. एकट्या मुंबईत 10 ठिकाणी छापे टाकलेल्या छाप्यात २२ कोटी जप्त करण्यात आले आहेत.