पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या
गेल्या १० दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. चार महानगरांमध्ये गेल्या १० दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत ७ वेळा कपात करण्यात आली आहे. पेट्रोलचा विचार केला तर, ७ फेब्रवारी पासुन आतापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत १ रुपया १५ पैशांनी कपात झाली आहे. तर ७ फेब्रुवारीपासुन आतापर्यंत डिझेलच्या दरात १.४६ रुपये प्रति लीटरने कपात झाली आहे.
गेल्या महिन्यात कच्च्या तेलाचा दर ७१ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला होता. ७ फेब्रुवारीपासून आतापर्यंत क्रुडचा दर ६४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी याचा दर ६४.३३ डॉलर प्रति बॅरल झाला. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढत होते. त्यानंतर केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये प्रति लीटर २ रुपये उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर अनेक राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली होती.