गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला, आता कोणत्याही क्षणी अटक

business news
बांधकाम व्यावसायिक डीएसकेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तसेच कोर्टाने गुंतवणुकदारांची देखील माफी मागितली आहे, डीएसके यांनी सांगितलेल्या वेळेत ते पैसे जमा न करू शकल्याने, कोर्टावर गुंतवणुकदारांची माफी मागण्याची वेळ आली आहे. सोबतच तुम्ही कोर्टाशी खोटं बोलले, तुम्ही कोर्टाला फसवलं, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, फक्त गुंतवणूकदारांसाठी, असंही कोर्टानं म्हटलं आहे.
 
आता डीएसके यांनी कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. हायकोर्टाने डीएसकेंना ख़डे बोल सुनावले आहेत. कोर्टाची तुम्ही फसवणूक करत आहात. तुम्हाला गुंतवणूकदारांकडे पाहून बरीच मुभा दिली. असं हायकोर्टानो म्हटलंय. डीएसकेंचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे.