सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

14 जून रोजी बंद राहतील एटीएम

आपण एचडीएफसी बँकेचे ग्राहक आहात तर आपल्याला एटीएममधून पैसे काढण्यासाठी अडचण होऊ शकते. बँकेने ग्राहकांना सूचित करत म्हटले आहे की 14 जून रात्रीपासून ते सकाळपर्यंत एटीएमहून कोणत्याही प्रकाराचे ट्रांजेक्शन होऊ शकणार नाही.
 
सॉफ्टवेअर अपग्रेड होत असल्यामुळे एचडीएफसी बँकेचे एटिएम आणि डेबिट कार्ड रात्री 12.30 वाजेपासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत काम करणार नाही. म्हणून आपण कोणत्याही प्रकाराचे ऑनलाईन, ऑफलाईन किंवा एटिएमहून कॅश काढू शकणार नाही. बँकेशी जुळलेले कार्य रात्री 12 आधी करून घ्यावे असा सल्ला बँकेने आपल्या ग्राहकांना दिला आहे. उल्लेखनीय आहे की 12 जून रोजी देखील सॉफ्टवेअर अपग्रेडमुळे एटिएमहून कोणत्याही प्रकाराचे ट्रांजेक्शन झाले नव्हते.